शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
4
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
5
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
6
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
8
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
9
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
10
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
11
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
12
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
13
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
14
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
15
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
16
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
17
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
18
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
19
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
20
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी

दुचाकीचा वाहन बाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:30 IST

नवरात्र व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत असून, अनेकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच वाहन खरेदीला सुरुवात केली आहे. अष्टमी, नवमी अन् दसºयाच्या दिवशी नवी कोरी दुचाकी घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन असून, जीएसटी लागू झाल्यानंतरही नवरात्रीमुळे दुचाकींच्या मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे.

नाशिक : नवरात्र व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत असून, अनेकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच वाहन खरेदीला सुरुवात केली आहे. अष्टमी, नवमी अन् दसºयाच्या दिवशी नवी कोरी दुचाकी घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन असून, जीएसटी लागू झाल्यानंतरही नवरात्रीमुळे दुचाकींच्या मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे.शहरातील दुचाकींच्या शोरूममध्ये अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. काहींनी डाऊन पेमेंट अदा केले आहे, तर अनेकांची बँकेची कर्जप्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे तीन ते चार हजार वाहने आरटीओकडे नोंदणीसाठी गेली असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. तर अनेक ग्राहकांनी दिवाळीला आपली दुचाकी घरी नेण्याचे नियोजन केले असून ते आतापासूनच रंग व विविध फिचर्सची माहिती घेऊन दुचाकीची बुकिंग करीत आहेत.  वाहन विक्रीच्या दालनांत ग्राहकांची गर्दी असून त्यांना विविध फायनान्स कंपन्यांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, आरटीओ कार्यालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे पाठविणे, वाहनाचा विमा भरून घेणे आदी कामांसाठी प्रतिनिधींची लगबग सुरू आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणाºयांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्या विश्वासू मेकॅनिकचा सल्ला घेतला आहे. जास्त अ‍ॅव्हरेज देणाºया वाहनासोबतच पुढील खर्चाचा विचारही ग्राहकांकडून केला जात असून दीर्घकाळ दमदार कामगिरी करणाºया दुचाकी वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.नोटाबंदीनंतर दुचाकी वाहन बाजार पूर्णपणे बसला होता. त्यानंतर बीएस-वाहने बंद झाल्याच्या कालावधीत मोठमोठ्या सवलती देऊन वाहनांची विक्री करावी लागली होती. याकाळात ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली. त्यामुळे या दसरा- दिवाळीत विक्रीविषयी साशंकता होती. मात्र दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहक आगाऊ बुुकिंग करीत आहे. नवरात्रीतही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.- प्रकाश खैरनार, विक्री व्यवस्थापक, कमल आॅटोकेअरबचतीच्या दृष्टीने ग्राहकांचा कलदुचाकी वाहन बाजारात सध्या विना गियरच्या (मोपेड) वाहनांना मागणी वाढली आहे. कुटुंबातील स्त्री, पुरुषांना सहजगत्या वापरता येत असल्याने ग्राहकांची मोपेड दुचाकींना पसंती मिळत असून ही वाहने ११० ते १२५ सीसीच्या इंजिनमध्ये असल्याने इंधनासाठीही परवडणारी आहेत. त्यामुळे बचतीच्या दृष्टीने ग्राहकांचा कल या वाहनांकडे वाढतो आहे.