देवळा : विंचूर-प्रकाशा महामार्गावर आठवडाभरापूर्वीच भावडघाटाच्या पायथ्याशी ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतांनाच याच मार्गावर रविवारी ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. भावडघाट ते देवळा हा रस्ता मृत्युचा सापळा ठरत असून येथे अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रविवार दि. १४ रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान रामेश्वर फाट्यानजीक असलेल्या इंडियन आॅईलच्या समृध्दी पेट्रोप पंपाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. बागलाण तालुक्यातील वाघळे येथील हा ट्रॅक्टर कांदे विक्र ीसाठी पिंपळगाव बसवंत येथे जात असताना देवळ्याच्या दिशेने येत असणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने रस्त्यावर सर्वत्र कांद्यांचा खच पडला हाता. या अपघातात दुचाकीस्वार श्रीकांत सुनील शिंदे ( वय - २३ रा. चिंचवे, ता. देवळा) जागीच ठार झाला. देवळा पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
रामेश्वर फाटयाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:10 IST