शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:18 IST

शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशीपुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला

नाशिक : शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाºया मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गरवारे पॉइंटपासून ठिकठिकाणी लहान ओव्हरब्रिज तयार करण्यात आले असून, या पुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला आहे, तर प्रकाश हॉटेल ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सर्वाधिक सुमारे सहाकिलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावरून रिक्षा, दुचाकी, फाइव्ह व्हिलर या वाहनांना पहिल्या दिवसांपासूनच बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनी समांतर किंवा पुलाखालील रस्त्याचा वापर करावा, असे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. परंतु असे असतानाही उड्डाणपुलावरून राजरोसपणे दुचाकी, तीनचाकी वाहनांची वर्दळ कायम असून, त्यातून लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मार्च २०१४ मध्ये या उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भरधाव वेगाने जाणाºया दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने दोघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती व त्यामुळेच सदरचा निर्णय घेण्यात आला होता. प्रारंभी उड्डाणपुलाचा वापर करणाºया दुचाकी, तीनचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जात होती. कालांतराने मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर ट्रिपल सीट दुचाकीवरून उड्डाणपुलाचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जात आहे.अपघाताला जबाबदारदोन आठवड्यांपूर्वी भरधाव वेगाने जाणारी दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व वाढत्या अपघाताला वाहतूक पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राष्टय महामार्ग प्राधिकरणाने दुचाकी वाहनांना बंदी घातलेली असताना त्याची अंमलबजावणी मात्र पोलीस करीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलावर तसेच ज्या ज्या ठिकाणांहून पुलावर वाहनांना चढण्यासाठी सोय करण्यात आली आहे अशा सर्वच ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.

टॅग्स :Accidentअपघात