शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाहने जप्त : महसूल प्रशासनाकडून कारवाई; पांजरापोळ संस्थेला नोटीस मालेगाव महानगरपालिकेचा कत्तलखाना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:37 IST

मालेगाव : भूसंपादनाच्या मोबदला प्रकरणातील जप्ती पाठोपाठ आता महसूल प्रशासनाने महापालिकेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

ठळक मुद्देकारवाईचा बडगामहिनाभरापूर्वी नोटीस

मालेगाव : भूसंपादनाच्या मोबदला प्रकरणातील जप्ती पाठोपाठ आता महसूल प्रशासनाने महापालिकेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. हरितपट्टा भागात अनधिकृतरित्या अकृषिक वापर करुन कत्तलखाना सुरू असल्यामुळे कत्तलखाना सील करण्यात आला तर लोकलेखा परिषदेचे दहा कोटी रूपये भरले नाहीत म्हणून मनपा मालकीची दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. पांजरापोळ संस्थेलाही नोटीस बजावण्यात आली असून दोन दिवसात अकृषिक वापर शुल्क भरला नाही तर कारवाई करण्यात येणार आहे.विविध मालमत्ता कर बुडविणाºया व अकृषिक वापर करणाºया मालमत्ताधारकांविरोधात येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील सर्व्हे क्रमांक १०८/२ मध्ये हरितपट्टा असताना महापालिकेने अनधिकृत कत्तलखाना उभारून अकृषिक वापर सुरू केला आहे. याबाबत महिनाभरापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. २३ लाख २६ हजार ७६ रूपये शुल्क भरणे अपेक्षित होते; मात्र महापालिकेने लक्ष दिले नसल्यामुळे तहसीलदार देवरे यांनी मंगळवारी मनपाच्या कत्तलखान्याला सील लावले आहे. तसेच महापालिकेकडून सर्व्हे क्रमांक ५४४ व ५४८ मधील जागा १९३६ साली भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. भाडेपट्टा करार १९८८ साली संपला आहे. या पोटी चार कोटी रूपये भरण्याचे नागपूर आॅडिटने सुचविले होते; मात्र महानगरपालिकेने भरले नाहीत. सद्यस्थितीत व्याजासह दहा कोटी रुपये महानगरपालिकेकडे महसूल विभागाचे घेणे आहे. मनपाने केवळ पाच लाख रुपये अदा केले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी महसूल प्रशासनाने मंगळवारी मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांची दोन वाहने जप्त केली आहे.कारवाईचा बडगाविविध मालमत्ता कर बुडविणाºया व अकृषिक वापर करणाºया मालमत्ताधारकांविरोधात येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील सर्व्हे क्रमांक १०८/२ मध्ये हरितपट्टा असताना महापालिकेने अनधिकृत कत्तलखाना उभारून अकृषिक वापर सुरू केला आहे. महिनाभरापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.