नाशिक : नागरिक दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर येत असल्याने अशा लोकांच्या दुचाकी पुढील ३ महिन्यांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अद्याप १ हजार ९५० दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीत जप्त करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक गरजेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सकाळी दहा ते चारदरम्यान भाजीपाला व किराणा दुकान सुरू ठेवण्याची मुदत असल्याने या कळात रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. ज्यांना काहीच सामान घ्यायचे नाही, अशा लोकांकडून विनाकारण गर्दी केली जात आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य सर्रासपणे भाजीपाला, किराणा खरेदीसाठी बाहेर फिरताना आढळून येत आहेत, त्यामुळेच लॉकडाउनचा फज्जा उडत आहे.
पोलिसांकडून दोन हजार दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:23 IST