शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत दोन हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 00:58 IST

नाशिक : शहरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने बाधितांच्या निवासस्थानाच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू केले असून, दोन दिवसांत दोन हजार ९०८ नागरिकांची माहिती घेऊन प्रसंगी तपासणी करण्यात आली आहे.

नाशिक : शहरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने बाधितांच्या निवासस्थानाच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू केले असून, दोन दिवसांत दोन हजार ९०८ नागरिकांची माहिती घेऊन प्रसंगी तपासणी करण्यात आली आहे. यात एक संशयित रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसरीकडे बाधितांच्या संपर्कातील अत्यंत जोखमीच्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.नाशिक शहरात या आधी एकच रुग्ण होता. त्याठिकाणी महापालिकेने तीन किमीचा परीघ सील केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या नागरिकांना १४ दिवस हा परिसर सोडता येणार नाही अशी स्थिती आहे. दरम्यान, महापालिकेने यानंतर आता अन्य दोन भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याठिकाणीदेखील अत्यंत काळजीपूर्वक आरोग्य हाताळणी सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील पाचशे मीटर अंतरावरील क्षेत्र सील करण्यात आले आहे. तीन ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्रात मिळून सध्या ५५ वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आले आहे. दोन बाधित रुग्णांच्या निवासाच्या परीक्षेत्रात दहा हजार ५७५ लोकसंख्या आहे. त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, त्यातील २ हजार ९०७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी एकाच्या संपर्कातील पाच तर दुसऱ्या बाधिताच्या संपर्कात २१ व्यक्ती जोखमीच्या होत्या, तर त्यापेक्षा कमी जोखमीच्या १७ व्यक्ती असल्याने त्यांच्याबाबत महापालिकेतील चिंता लागून होती. त्यातील बाधिताच्या कुटुंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक