शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या  दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:14 IST

एकलहरारोड कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाच्या खिडकीची काच फोडून एक लाख रुपये किमतीचे साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल जप्त केला आहे.

नाशिकरोड : एकलहरारोड कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाच्या खिडकीची काच फोडून एक लाख रुपये किमतीचे साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल जप्त केला आहे.  कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाची पाठीमागील खिडकीची काच फोडून शनिवार १४ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी सहा स्पिकर, दोन एम्प्लिफायर, एक लाइव्ह मिक्सिंग कन्सोल, चार एलइडी लाइट असा सुमारे ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सुरक्षा ठेकेदार परमेश्वर कुंचबिहारी दुबे यांनी गुरुवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.  नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, दुय्यम पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, विशाल कुवर, समाधान वाजे, राजेंद्र जाधव यांनी संशयित रवि सुरेश पवार (वय २२ रा. दसक, जेलरोड) दीपक ऊर्फ सोनू गोरख मोरे (नय २०, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे. दोघा संशयितांना शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार (३० एप्रिल)पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय