शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कळवणला बेहडी नदीपात्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:56 IST

कळवण : शाळा सुटल्यानंतर प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडलेल्या इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणार्या दोघा विद्यार्थ्यांचा कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हे दोघे विद्यार्थी हे कळवण शहरातील आर के एम शाळेत शिक्षण घेत होते.

ठळक मुद्दे कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

कळवण : शाळा सुटल्यानंतर प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडलेल्या इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणार्या दोघा विद्यार्थ्यांचा कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हे दोघे विद्यार्थी हे कळवण शहरातील आर के एम शाळेत शिक्षण घेत होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती. शाळा सुटल्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वप्नील राजेंद्र ठाकरे रा. शिवाजी नगर कळवण व इयत्ता दहावीतील विद्यार्थी मयूर दत्तु वाघ रा गणेश खेडगाव हे दोघे एक वाजेच्या सुमारास प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडून कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.या नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. व पाण्यात उडी मारल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. याठिकाणी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा प्रकार पिहला त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. पाणी खोल असल्याकारणाने त्यांना काढण्यासाठी थोडा वेळ लागला होता. त्यांना बाहेर काढल्यानंतर तात्काळ कळवण उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.शालेय विद्यार्थी नदीपात्रात बुडाल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली असता नदीपात्राकडे बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच उपजिल्हा रु ग्णालयात कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ?ड शशिकांत पवार , प्राचार्य एल डी पगार व शिक्षकवृंदासह, नातेवाई व नागरिकांनी गर्दी केली होती. इयत्ता नववीत शिकणारा स्विप्नल राजेंद्र ठाकरे हा मूळ राहणारा जुन्नर बोडरी ता बागलाण येथील रिहवाशी असून त्याची बहीण रोहिणी भरत खैरणार यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी गेला होता परंतु प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जात असल्याचे कारण सांगून तर दुसर्याने मित्राचा वाढिदवस असल्याचे कारण सांगून मित्रांसोबत बाहेर गेला होता . परंतु तो प्रोजेक्ट तयार करण्यासाठी न जाता पोहण्यासाठी बेहडी नदीवर गेल्याने हि दुर्दवी घटना घडली हि वार्ता कळवण शहरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीdrowningपाण्यात बुडणे