देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील विजेच्या धक्क्याने दोन सख्या बहिणी बेशुद्ध होऊन जखमी झाल्याने त्यांना तत्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कैलास गारे यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान अचानक झालेल्या पावसाच्या वातावरणात सामुंडी येथील वसंत लामटे यांच्या दोन्ही मुली रस्त्याच्या कडेने जात असताना बाजूला असलेल्या भेंडीच्या झाडाजवळ अचानक विजेच्या झालेल्या गडगडाटाने पडलेल्या विजेच्या धक्क्याने अपेक्षा वसंत लामटे (वय ११ वर्ष ) आणि छाया वसंत लामटे( वय ८ वर्ष) या दोघी भगिनी बेशुद्ध होऊन जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
विजेच्या धक्याने दोन बहिणी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 00:52 IST