शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:55 IST

रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला.

ठळक मुद्देरिक्षा, रोख रक्कम घेऊन पोबारा केलावनक्षेत्रपालाच्या कारची काच फोडलीलाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली

नाशिक : पेठरोडवरील नवनाथनगरमधील झनकर चाळीत दोघांनी कोयत्यासह धाव घेऊन दोघा भावांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. दोघा संशयितांनी फिर्यादीच्या ताब्यातील रिक्षा, रोख रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी रोहित नारायण पवार (१९, रा.नवनाथनगर) हा त्याचा भाऊ रोहित बोराडेसोबत रिक्षाने (एम.एच.१५ एफयू ३८७५) शनि मंदिरापाठीमागे गेले. तेथे दि. ३१ डिसेंबरच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास संशयित दिगंबर वाघ, मयुर पठाडे या दोघांनी ‘तू आम्हाला सिडको येथे सोडत का नाही’ असे सांगून कुरापत काढून रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला. त्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, दोघा संशयितांनी ९०० रुपयांची रक्कम, रिक्षा बळजबरीने घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.वनक्षेत्रपालाच्या कारची काच फोडलीनाशिक : येथील प्रदीप रमेश कदम यांची (२८,रा.यशराज पार्क, कामटवाडा) ह्युंदायी कारची (एम.एच१२ आरवाय ४१४२) चालकबाजूची काच फोडून कारमधील सोनी कंपनीचे म्युझिक सिस्टीम, एसी वेन्ट, बॅगमधील शासकिय कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकRobberyचोरी