शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या फसवणूकप्रकरणी नाशिकच्या दोघा पोतनीस बंधूंना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:01 IST

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली.

ठळक मुद्दे' सुनंद कन्स्ट्रक्शन' कंपनीच्या तिघा संशयित संचालकांपैकी दोघांना अटक सदनिका व गाळा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४४ लाख रुपयांचा अपहार बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली

नाशिक : सदनिका व गाळे देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सुनंद कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड इस्टेट कंपनीच्या तिघा संशयित संचालकांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि.७) दोघा बंधूंना न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुनंद  कंपनीचे संचालक संशयित वंदन अरविंद पोतनीस, सुहास अरविंद पोतनीस, आनंद अरविंद पोतनीस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सुभाष राजाराम आंबेकर यांनी या तिघा संशयितांविरुद्ध सदनिका व गाळा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. भगत यांनी दोघा पोतनीस बंधूंना येत्या ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वंदन पोतनीस हे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCourtन्यायालय