सिडको : शिंदे गावात शेतकऱ्यांचा टेम्पो अडवून लूट करीत गोळीबार करणाऱ्या चौघा संशयितांना अंबड पोलिसांनी वाडीवऱ्हेजवळील राजूर बहुला परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले़ पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.या चौघांवर सिडकोतील विश्वनाथ दातीर या टेम्पोचालकाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल आहे़ नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्री करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो इंडिका व्हिस्टा कारमध्ये आलेल्या (एमएच १५, डीएस-८३५०) चौघा संशयितांनी लूट करीत हवेत गोळीबार करण्याची घटना रविवार (दि़२८) रोजी शिंदे गावात घडली होती़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित निखिल विलास गवळी (५५), अक्षय युवराज पाटील (२०, रा़ दोघेही सातपूर), संतोष श्याम कोतेवार (२१, रा़ द्वारका), राकेश अंबालाल सोनार (२२, सातपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त
By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST