शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

टँकरवर तवेरा आदळून मालेगावचे दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

पंचवटीत अपघात : महिलेसह चालक ठार पंचवटी : मुंबई - आग्रा महामार्गावरील कक़ा़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भरधाव तवेरा गॅस टँकरवर पाठीमागून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेसह कारचालक ठार झाल्याची घटना सोमवारी (दि़ १४) सकाळच्या सुमारास घडली़

पंचवटी : मुंबई - आग्रा महामार्गावरील कक़ा़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भरधाव तवेरा गॅस टँकरवर पाठीमागून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेसह कारचालक ठार झाल्याची घटना सोमवारी (दि़ १४) सकाळच्या सुमारास घडली़ पुष्पा देवकिसन गगराणी (५२, रा़ मामलेदार गल्ली, मालेगाव) व तवेरा कारचालक गोरख लक्ष्मण पवार (३९, रा़ सौंदाणे, मालेगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असून, देवकिसन नठमल गगराणी हे (५९) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावच्या मामलेदार गल्लीतील रहिवासी व व्यावसायिक देवकिसन गगराणी यांचा अमेरिकेत स्थायिक झालेला मुलगा वैभव सुटीनिमित्त सहकुटुंब मालेगावला आला होता़ सुटी संपल्याने तसेच सोमवारी पहाटे अमेरिकेला जाण्यासाठी फ्लाईट असल्याने गगराणी दाम्पत्य मुलगा, सून व नातवंडे यांना सोडण्यासाठी रविवारी (दि. १३) रात्री मालेगाव येथून तवेरा कारने (एमएच ४१, एएम ९१९१) मुंबई विमानतळावर गेले होते़ या सर्वांना सोडल्यानंतर ते पुन्हा मालेगावला निघाले होते़ सोमवारी (दि़१४) सकाळी सात वाजेच्या सुमारास क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळ उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर गतिरोधकाजवळून ओझरकडे जाणाºया गॅस टँकरवर (केए ०१, एजी २०६६) त्यांची भरधाव तवेरा कार पाठीमागून जाऊन आदळली़ यामध्ये चालक गोरख पवार व पुष्पा गगराणी यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़, तर देवकिसन गगराणी यांचे डोके, हात व पायास मार लागल्याने त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, तवेरा कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला तर तवेरा कार गॅस टँकरखाली अडकली़ पंचवटी अग्निशमन दल उपविभागीय कार्यालयाच्या कर्मचाºयांनी कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा कापून जखमी व मृतांना बाहेर काढले. या अपघाताचे वृत्त कळताच आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़विमानतळावरून परतताना काळाचा घाला़़़मालेगाव येथील गगराणी दाम्पत्याचा मुलगा वैभव हा अमेरिकेत स्थायिक आहे़ त्यास सुटी असल्याने काही दिवसांपूर्वी वैभव हा पत्नी भावना व दोन मुले ओम व जय यांच्यासह मालेगावला आला होता़ सुटी संपल्याने तसेच सोमवारी पहाटे मुंबईहून फ्लाईट असल्याने गगराणी दाम्पत्य तवेरा कारने मुंबईला गेले होते़ मुलगा व सून व नातवंडांना विमानतळावर सोडल्यानंतर मालेगावला परतत असताना सकाळी हा अपघात झाला़