शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चेंबरमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 5, 2015 22:46 IST

चेंबरमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू

 नाशिक : सातपूरमधील एका कारखान्यात तुंबलेली गटार मोकळी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या एका कामगारासह दोन जणांचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एका कर्मचाऱ्याला चेंबरमधून बाहेर काढण्यात अग्निशमक दलाला यश आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विनोद मारू आणि दीपक रामचंद्र माळी अशी या दोघा मृत कामगारांची नावे असून, त्यापैकी माळी हा पालिकेचा कर्मचारी नव्हता. अवघ्या दहा महिन्यांतच अशी दुसरी दुर्घटना घडल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, संतप्त कर्मचारी आणि आप्तेष्टांनी या दोघा कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर अखेरीस मृतदेह ताब्यात घेण्यात आले.या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून, त्याचबरोबर मृत कामगारांच्या वारस पत्नींना पालिकेच्या सेवेत रोजंदारीवर घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीत नाईस एरियामध्ये सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागातील सी १२ रोडवर श्री साईश इंजिनिअरिंग कंपनी असून, तिचे गटार तुंबल्याने कंपनीचे मालक प्रमोद वैद्य यांनी पालिकेला रीतसर कळविले आणि आवश्यक ती रक्कम भरली होती. त्यानुसार पालिकेचे कर्मचारी सकाळी अकरा वाजता पालिकेचे व्हॅक्यूम एम्टीयर वाहन घेऊन तेथे गेले. यावेळी विनोद मारू आणि त्याचा मित्र असलेला खासगी कामगार दीपक माळी तसेच संतोष जाधव हे तिघे वाहनासमवेत गेले. मारू आणि माळी यांनी चेंबरचा ढापा काढून व्हॅक्यूम एम्प्टीयरच्या सहाय्याने तुंबलेले पाणी काढून घेतले. मात्र, पाइप गाळातच अडकला. चेंबरमध्ये वाकून तो पाइप ओढत असतानाच विनोद मारूचा तोल गेला आणि तो चेंबरच्या पंधरा फूट खोल टाकीत पडला. त्यामुळे दीपक माळी त्याला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरला; परंतु तोही खोलवर आत गेल्याने पालिकेचा कर्मचारी संतोष जाधव हा चेंबरमध्ये उतरला आणि तोही चेंबरमध्येच अडकला. सदरचा प्रकार बघताच भयभीत झालेले वाहनचालक प्रकाश मोहिते यांनी अग्निशमन दलाला दूरध्वनी केला. काही वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी टाकीत उतरून दोराच्या सहाय्याने तिघांनाही बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मारू आणि माळी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. संतोष जाधव मात्र बचावला; परंतु त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.