वटार : येथील विंचुरे शिवारात अमृतसागर धरणात गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बकºया चारण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बंधाºयात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. मृतात कविता सोनवणे (१४) व दत्तात्रेय पवार (१२) यांचा समावेश आहे. कविता ही आठव्या ईयत्तेत शिकत होती. दत्तात्रेय पवार हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शाळा सुटल्यानंतर बकºया चारण्याचे काम करतो.दुपारी धरणावर बकºयांना पाणी पाजण्यासाठी तो गेला होता. बंधाºयाच्या काठावर हातपाय धुवत असताना अचानक त्याच्या सोबत असलेल्या कविताचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी गेलेला दत्तू याचाही तोल गेल्याने तो पाण्यात पडला.स्थानिक नागरिकांनी वृत्त कळताच घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. तब्बल दोन तासानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर घटनेचे माहिती पोलिस पाटिल यांनी पोलिस्टेशनला कळवली असता पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
वटारला बंधाºयात पडून दोन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:14 IST