शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक एज्युकेशनसाठी दोन पॅनल रिंगणातप्रचाराला वेग : १७ रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:59 IST

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाºया निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत. दरम्यान, प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जात आहे.

ठळक मुद्देनाशिक एज्युकेशनसाठी दोन पॅनल रिंगणातप्रचाराला वेग : १७ रोजी मतदानप्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाºया निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत. दरम्यान, प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जात आहे.अध्यक्षपदावर सूर्यकांत रहाळकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यवाह पदासाठी निवडणूक होत आहे. उपाध्यक्ष- २, कार्यकारिणी- ८ आणि कार्यवाह- १ अशा ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली रहाळकर पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून, प्रतिस्पर्धी एन. एस. हितकारी पॅनलनेही उमेदवार उभे केले आहेत.सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिलीप फडके आणि चंद्रशेखर मोंढे उपाध्यक्षपदासाठी रिंगणात असून, कार्यवाह पदासाठी रहाळकर पॅनलचे राजेंद्र निकम यांनी शशांक मदाने यांना आव्हान दिले आहे. तर कार्यकारी मंडळातून पांडुरंग अकोलकर, सरोजिनी तारापूरकर, चंद्रशेखर वाड, भास्कर कोठावदे, विनायक देशपांडे, रतनशेठ भट्टड, श्रीकृष्ण शिरोडे रिंगणात आहेत.हितकारी पॅनलचे सुहास अष्टपुत्रे आणि स्नेहमयी भिडे उपाध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. तर कार्यवाह म्हणून शशांक मदाने पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. कार्यकारी मंडळातून वैशाली कुलकर्णी, हेमंत जानवे, वीणानवले, रेखा क्षीरसागर, स्नेहमयी भिडे, सुहास अष्टपुत्रे हे उमेदवारी करीत आहेत.पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी कर्मचाºयांनी मिळून एन. एस. हितकारी पॅनलची निर्मिती केली आहे. तर रहाळकर पॅनलने अनुभव तसेच संस्थेच्या कामात सक्रिय असलेले उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. दोन्ही पॅनलने प्रचाराला सुरुवात केली असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार रंगत आहे.