शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव फाट्याजवळ आयशरच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:27 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

ठळक मुद्देमालेगाव येथील घटना : संतप्त जमावाने रोखला महामार्ग

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.  दरम्यान, चंदनपुरी व सवंदगाव शिवारात अपघातांची मालिका वाढल्याने माजी आमदार आसीफ शेख यांनी समर्थकांसह महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी  (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मालेगावकडून चाळीसगावकडे दुचाकी (एमएच १९ बीए ४३५२) वर जाणाऱ्या पंकज पाटीलसह एका महिलेला आयशर (एमएच १८ बीबी ०११७) हिने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. पोलीसांनी आयशर चालक द्रोणागिरी गोसावी (रा. अवधान, जि. धुळे) याला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार कैलास गुजर, हवालदार अक्षय पाटील, सचिन दळवी करीत आहेत.आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर अपघातातील अन्य एका मृत महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही. या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दुचाकी क्रमांकावरून दाम्पत्य हे चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे प्रथमदर्शनी  निदर्शनास आले आहे. चंदनपुरी, सवंदगाव, दरेगाव, म्हाळदे शिवारात अपघातांची मालिका वाढली आहे. यामुळे माजी आमदार शेख यांनी चाळीसगाव ते टेहरे फाट्यादरम्यान गतिरोधक बसवावेत. पथदिवे सुरू करावे. झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे मारावेत. सवंदगाव, दरेगाव, म्हाळदेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हायमास्ट बसवावेत. रस्त्याचे सहापदरीकरण करावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले.  आंदोलनात माजी नगरसेवक शकील जानीबेग, अज्जूभाई लसूनवाला, राजू इंजिनिअर, रफीक खजूरवाले आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागेया मार्गावर अपघातांच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने अपघात कमी होण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात या मागणीसाठी जमावाने सुमारे अर्धातास महामार्ग रोखून धरला होता. घटनेचे वृत्त कळताच  तहसीलदार राजपूत, पोलीस उपअधीक्षक शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल कंपनी अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी  चर्चा करुन या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघात