शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

चांदवड चौफुलीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात दोन जखमी

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

चांदवड चौफुलीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात दोन जखमी

चांदवड - येथील पेट्रोलपंप चौफुलीवर दोन कंटेनरचा विचित्र अपघात झाला, तर मनमाडकडे वळण घेणाऱ्या कंटेनरचे पुढील तोंड विचित्र पद्धतीने तुटून विरुद्ध बाजुला गेले या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, मुंबई आग्रारोडवरील चौफुलीवरील महाकाय कंटेनर काढण्यासाठी तेवढ्या क्षमतेचा क्रेन उपलब्ध न झाल्याने दोन्ही अपघातग्रस्त कंटेनर सुमारे १८ तास तसेच पडून होते तर वाहतूक ही पर्यायी रोडने काढण्यात आली. शनिवार दि. २८ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मालेगावकडून येणारा कंटेनर (क्रमांक एम.एच. ४६ एच/ २८६३) हा भरधाव वेगाने येताना नाशिककडून मोठे वजनदार पाइप भरून मनमाडकडे वळण घेणारा कंटेनर (क्रमांक जी.जे. १२ /झेड. १५४३) यास धडक दिल्याने मालेगावकडून येणाऱ्या कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर राजेंद्र खेडकर, शरद राजेंद्र खेडकर हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले. दुसऱ्या कंटेनरमधील चालक व वाहक पळून गेले. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर, जमादार एम. के. बर्डे, एन. डी. शिरसाठ हे करीत आहेत. मात्र रात्री ११ वाजता हा अपघात झाला याच ठिकाणी चांदवड चौफुलीवर अनेक काळी पिवळी वाहने प्रवासी भरतात मात्र सुदैवाने रात्र असल्याने कोणतेही वाहन रस्त्यात नव्हते तर हा अपघातातील महाकाय कंटेनर काढण्यासाठी तेवढ्या क्षमतेचे क्रेन नसल्याने दोन्ही कंटेनर सुमारे १८ तास तसेच पडून होते, तर नाशिककडील वाहतूक दिवसभर पर्यायी बायपास रस्त्याने वळविली. (वार्ताहर)