शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

घोटी येथे सिलिंडर स्फोटात दोघे जखमी

By admin | Updated: January 21, 2017 22:58 IST

घोटी येथे सिलिंडर स्फोटात दोघे जखमी

घोटी : शहरातील बाजार समितीच्या मागील वसाहतीत शनिवारी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोनजण जखमी झाले. गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, याबाबत घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.शहरातील बाजार समतिीच्या मागील बाजूस असणाऱ्या नागरी वसाहतीत अनेक कामगार भाडे तत्त्वावर राहतात. यात दगडू सोनवणे यांच्या चाळीत जिंदाल कारखान्यात काम करणारे चंद्रप्रकाश सूर्यबली चौहान हे आपल्या कुटुंबासह भाडे तत्त्वावर राहतात. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी उठले. त्यांनी गॅस चालू करण्याचा प्रयत्न केला असता, सिलिंडरने पेट घेतला. दरम्यान चंद्रप्रकाश चौहान यांनी आरडाओरड करीत पत्नीला व मुलांना घराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर झालेल्या स्फोटात स्वयंपाकघरातील किचन ओटा, दरवाजा, खिडक्या, कपडे आदिंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चंद्रप्रकाश चौहान हे भाजल्याने जखमी झाले आहेत. चौहान कुटुंबाचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी आलेले घरमालक अजय सोनवणे हेही यात जखमी झाले.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रीतम लोखंडे यांच्यासह जयप्रकाश नागरे, प्रशांत जाधव आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गॅस गळतीने सिलिंडरने पेट घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर)