शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात दोन अपक्षांचे अर्ज अवैध

By admin | Updated: September 29, 2014 22:53 IST

येवल्यात दोन अपक्षांचे अर्ज अवैध

येवला : येवला विधानसभा मतदारसंघात सोमवारी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.प्रवीण भाऊसाहेब मढवई यांनी बहुजन समाज पक्षाच्या वतीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. भागवत सोनवणे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील काही रकाने परिपूर्ण भरले नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. कॉँग्रेसचे उमेदवार निवृत्ती (तात्या) लहरे यांच्या उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र मुद्रांक खरेदी केले त्या जागी स्वाक्षरी नाही, अशी लेखी हरकत राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी घेतली. दोन्ही बाजूच्या वतीने तासभर युक्तिवाद करण्यात आला.उमेदवार तात्या लहरे यांनी स्वत: युक्तिवाद करताना स्टॅम्प पेपरवर जरी स्वाक्षरी नसली तरी स्टॅम्पवेंडरकडे असलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी आहे. यावर नोंदणीक्र मांकदेखील आहे. प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्पपेपर वापरण्याची गरज नाही. साध्या कागदावरदेखील सादर करता येते, असे निवडणूक निर्णय अधिकारी वासंती माळी यांना सांगितले. सुमारे तासाभरानंतर तांत्रिक बाब असल्याचे निकालपत्रकात नमूद करून हरकत फेटाळण्यात आली व तात्या लहरे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला. या निकालाचा निर्णय काय येतो? हे ऐकण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते तहसील आवारात उपस्थित होते. पौलस आहिरे, (बसपा), छगन भुजबळ (राष्ट्रवादी), संभाजी पवार (शिवसेना), मानकर शिवाजी (भाजप), निवृत्ती लहरे (भारतीय राष्ट्रीय कॉँगे्रस), दीपक लाठे (बहुजन मुक्ती पार्टी), संजय सोनवणे (आंबेडकर पार्टी आॅफ इंडिया).याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून नयन कुशारे, गुलामनबी खाटिक, अभिजित गायकवाड, सुनील घोडेराव, दत्तात्रेय चव्हाण, पुष्पा बनसोडे, अशोक मोहारे, शेख अ. वहाब, नारायण साबळे, रणजीत संसारे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले.