शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे जादा बसेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:30 IST

सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून शनिवारी (दि.२१) मध्यरात्रीपर्यंत परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांनी पुकारलेला राज्यव्यापी संप सुरू होता. या चार दिवसांत नाशिक विभागाला ऐन दिवाळीत चार कोटींचा फटका बसला असून, हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे. यासाठी दोनशे जादा बसेस रस्त्यावर धावत आहेत.

नाशिक : सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून शनिवारी (दि.२१) मध्यरात्रीपर्यंत परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांनी पुकारलेला राज्यव्यापी संप सुरू होता. या चार दिवसांत नाशिक विभागाला ऐन दिवाळीत चार कोटींचा फटका बसला असून, हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे. यासाठी दोनशे जादा बसेस रस्त्यावर धावत आहेत.  गेल्या मंगळवारपासून बसचालक-वाहक राज्यव्यापी संपावर गेल्यामुळे परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील सर्वच मार्गावरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे ‘लालपरी’ गेली कुठे? असाच प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात होता. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांचा संप बेकायदेशीर असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. न्यायालयाने सर्व कर्मचाºयांना तत्काळ सेवेत रुजू होण्याचा आदेश दिला. तसेच सरकारला पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेशित केले. यानंतर परिवहन महामंडळाच्या राज्य कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला. धनत्रयोदशी ते भाऊबीज असा दिवाळीचा हंगाम हा महामंडळासाठी एक पर्वणीकाळ असतो. या कालावधीत नाशिक विभागाला दिवसाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते; मात्र या चारही दिवस संपामुळे गाजल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे....अखेर ‘लालपरी’ हसलीन्यायालयाचा आदेश प्राप्त होताच राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आणि चार दिवसांपासून रुसलेली ‘लालपरी’ अखेर हसली, अशाच काहीशा प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलून दाखविल्या. चार दिवसांपासून एसटीची चाके रुतली होती. परिवहन महामंडळाच्या कारभाराविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. संप मिटल्यानंतर परिवहन विभागासह महामंडळाने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.शहर बससेवाही पूर्ववतचार दिवसांपासून नाशिककरांची शहर बस अदृश्य झाली होती. शहर बससेवेचे जंक्शन म्हणून ओळखले जाणारे निमाणी बसस्थानक ओस पडल्याचे चित्र होते. संप मिटल्यानंतर शहर बससेवा पूर्ववत झाली आणि पुन्हा बसस्थानक गजबजले. नाशिकरोड बसस्थानकासह शहरातील सर्व मार्गांवर शहर बसेसचे दर्शन घडू लागल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. शहर बसेसच्या सर्व नियोजित फेºया विविध मार्गांवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.