शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:53 IST

मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटानजिक असलेल्या एका हॉटेलमध्ये शिंदेसेनेच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

नाशिक (दिनेश पाठक) : मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटानजिक असलेल्या एका हॉटेलमध्ये शिंदेसेनेच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. सोमवारी (दि.११) दुपारी ४ वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसात भिडल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ उडाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. यानंतर शिंदेसेनेचे अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या बाबूशेठ टायरवाल यांच्यात वाद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या मदतीने वाद मिटविण्यात आला.

Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणारसोमवारी (दि. ११) नाशिक येथे धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य मुख्य पदाधिकारी बैठकीआ उपस्थित होते. बैठक आटोपल्यावर तेथेच वादावादी सुरू झाली. त्यात दोन, तीन पदाधिकारी बाहेर पडले. ज्यांच्यात वाद झाला तेही एकमेकांवर ताेंडसुख घेत बाहेर पडले अन् बाहेर लॉन्समध्ये एकमेकांंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. आतमधून मंत्री उदय सामंत यांनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलच्या बाहेर जाण्याचा निरोप पाठविला. तेव्हा सुरक्षा रक्षक व पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी वाद झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळदेखील केली.‘तो’ पदाधिकारी कर्जत तालुक्याचा?कर्जत तालुक्यातील (जि.आहिल्यानगर) शरद पवार गटाचा एक कार्यकर्ता बैठकीत शिरला होता. त्याला आम्ही हटकले असता त्याच्यासाेबतच्या कार्यकर्त्यांनी ओरडण्यास सुरूवात केली, अशी प्रतिक्रिया आहिल्यानगर येथील पदाधिकाऱ्याने दिली. तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी आमच्याच पक्षातील हा किरकाेळ वाद असल्याचे सांगितले.उदय सामंत यांच्याकडून इन्कारशरद पवार गटाचा कोणताही कार्यकर्ता बैठकीत शिरला नव्हता. अहिल्यानगर येथील आमच्याच पदाधिकाऱ्यांत किरकोळ वाद झाला. मात्र पक्ष याची योग्य दखल घेणार असून, वादाचा व्हिडीओ तपासून संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिक