शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:08 IST

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याचा सोमवारी (दि.६) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेल्या दोन शेळी ठार केल्या तर एक बोकड उचलून घेऊन जाण्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देनिकवेल : एक बोकड पळविल्याचा शक्यता व्यक्त

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याचा सोमवारी (दि.६) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेल्या दोन शेळी ठार केल्या तर एक बोकड उचलून घेऊन जाण्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.निकवेल शिवारातील ही दूसरी-तिसरी घटना असल्यामुळे येथील ग्रामस्थ दहशतीमधे वावरतआहेत. येथील गावजवळी ५/१ गट नंबर असलेले सागर सोनावणे यांच्या मळ्यात शेतमंजूर भगवान दगा पवार हा त्याच्या कुटूंबासह रहात असून उदनिर्वाह हे कोण्याच्याही शेता जाऊन काम करणे तसेच शेळी व बोकडसाठी चारा जमा करणे यावर अवलंबून आहे. सोमवारी (दि.६) रात्री त्याच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ल्या करीत दोन शेळींना ठार केले. तसेच एक बोकड पळविल्याची घटना घडली. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. या घटनेनंतर त्यांनी वनकमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. वन कर्मचारी प्रफुल पाटील व त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.ही घटना गावात तिसरी असून निकवेल येथे या पाहिले राजाराम वाघ या शेतकरी याचे ही पंधरा दिवस पाहिले बिबट्याने शेळी ठार केली होती. या बिबट्याच्या संचारमुळे शेतकरीबांधव रात्रीे शेतात पाणी भरण्यात घाबरत आहे.वीज वितरण कंपनीने वेळ बदलल्यामुळे रात्रीे शेतकºयांना पाणी भरावे लागते. पण बिबट्याच्या मुक्त संचारामुळे दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात बिबट्यचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन अधिकाºयांकडे केली. निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेरअमन नीलेश वाघ, उपसंरपच मुरलीधर वाघ, पोपट म्हसदे, निलेश खरे, सागर सोनवणे, रामराव अणारे, निलेश वाघ, विशाल वाघ यांच्यासह ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे.दहिंदुले, जोरण, कंधाणे शिवारात नेहमी आढळणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून निकवेल गावात मुक्त संचार करताना दिसत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने शेतकरी, मजूर व पशुपालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागात गेल्या दोन मिहन्यापासून बिबट्याचा संचार आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेत शिवारातील कामे खोळंबली आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे. व ज्या शेतकºयांच्या जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे , त्यांना त्वरीत नुकसान भरपाई दयावी.- विवेक सोनवणे, अध्यक्ष, निकवेल वन कमिटी.आमच्या निकवेल शिवारात बिबटयाचा गेल्या एक ते दोन महिन्यांपासुन दहशतीचे वातावरण आहे. आम्ही वारंवार मागणी करुनही बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला नाही.- नीलेश वाघ, चेरअमन, वि. वि. का. सोसायटी.