शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाडगणला दोन शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:55 IST

जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देजायखेडा : परिसरात बिबट्याची दहशत

जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागानेबिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जायखेडा येथील ग्रा. पं. माजी सदस्य रमेश पुंडलिक अहिरे यांच्या पाडगण शिवारातील शेतातील बंदिस्त गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने आत प्रवेश करून दोन शेळ्या फस्त केल्या. सकाळी रमेश अहिरे हे शेळ्यांना चारा-पाणी करण्यासाठी गेले असता, गोठ्यात शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. अहिरे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलविले. रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळ्या ठार झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना माहिती दिली. वनरक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनविभागाने शेतकºयाला शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथे बिबट्या पकडण्यात आले. लष्करी हद्दीजवळ असलेल्या पोल्ट्रीफार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला चार तासांच्या रेस्क्यूनंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेमुळे वनकर्मचाºयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. होता. मात्र पाडगणला बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. जायखेडा परिसरातील बिबट्या पकडला तर नागरिकांची भीती दूर होईल, असे मत व्यक्त होत आहे.शेतकºयांनी घराबाहेर पडताना दिवसा उजेडातच बाहेर पडावे, शेतामध्ये जाताना आवाज करीत, गाणी वाजवत जावे, एकटे बाहेर पडू नये तसेच जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.