नांदगाव : तालुक्यातील कºही येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.पाण्याच्या शोधार्थ शुक्रवारी (दि. १२) सकाळी हरणांचा कळप मानवी वस्तीत आला होता. पिण्यासाठी पाणी शोधत असताना कुत्र्यांनी हल्ला करताच ती घाबरून पळाली. मात्र विहिरीचा अंदाज न आल्याने पाचही हरीण विहिरीत पडले. नागरिकांच्या मदतीने सर्व हरणांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील दोन हरणांचा मृत्यू झाला. बाहेर काढताच तीनही हरणांनी जंगलाकडे धाव घेतली.तालुक्यातील जंगल परिसरात सध्या पाणी नाही व वन्यप्राण्यांना चारादेखील नाही. दूरपर्यंत हिरवे झाडदेखील दिसत नाही. वन्यप्राणी कुठेतरी दगडाच्या किंवा खुरट्या झाडाच्या आडोशाला सावलीत बसतात. जंगलात पिण्यासाठी पाणी व गवतदेखील नसल्याने हरीण, लांडगे, कोल्हे मोर मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत रस्ता ओलांडताना सात हरणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
पाण्याच्या शोधात विहिंरीत पडून दोन हरीण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:03 IST
नांदगाव : तालुक्यातील कºही येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
पाण्याच्या शोधात विहिंरीत पडून दोन हरीण ठार
ठळक मुद्दे बाहेर काढताच तीनही हरणांनी जंगलाकडे धाव घेतली.