शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगावला दोन दिवसाचा लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:28 IST

ब्राह्मणगाव : येथे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शनिवार, रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी सांगितले. कोरोना साखळी तुटावी म्हणून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकारोना : उन्हाची तीव्रता वाढल्याने रस्ते ही निर्मनुष्य

ब्राह्मणगाव : येथे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शनिवार, रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी सांगितले. कोरोना साखळी तुटावी म्हणून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.गावात कोरोनाचे एकूण ३० रुग्ण संख्या होऊन त्यात एक ५ वर्ष व १ एक ३ वर्षीय लहान मुले ही कोरोना ग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे. त्यातच एक ६२ वर्षीय रुग्ण दगावला असून गावात शनिवार व रविवारी दोन दिवस पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंचअहिरे यांनी दिली.शनिवार व रविवार दोन दिवस मेडिकल, दूध वगळता सर्व व्यवसायिक दुकाने बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत औषध फवारणी करण्यात येत असून गावातील पडीत जागेवरील पालापाचोळा, अनावश्यक झाडे यांची साफसफाई करण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्टिंग करण्यात येत असून कोरोना रुग्ण आढळलेल्या घरावर आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका व आशा कार्यकर्त्या यांचे मार्फत दरवाजावर नोटीसा लाऊन प्रत्येक घरातील पाणी साठवलेल्या टाक्या तपासण्यात येऊन स्वच्छते बाबत सूचना देण्यात येत आहेत.गावात सद्या एकूण २८ रुग्ण संख्या असून आतापर्यंत एकूण १२०० व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी सांगितले.दरम्यान गावातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क आवश्यक लावावा अन्यथा ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाईचा इशारा ग्रामविकास अधिकारी बी. एन. ठोके यांनी दिला आहे.(०३ ब्राह्मणगाव)ब्राह्मणगाव येथे ग्रामपंचायतीकडून गावात बंदचे आवाहन करताना सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे, सदस्य विनोद अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत कदम, अहिरे,मालपाणी आदी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य