शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील ओखी वादळग्रस्तांना दोन दिवसांत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:12 IST

अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्री वादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शेतीपिकांना बसला होता.

ठळक मुद्देदीड हजार शेतकरी : थेट खात्यावर होणार पैसे जमाजिल्ह्यातील १७० गावातील सुमारे दीड हजार शेतक-यांना फटका

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतक-यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत सदरची रक्कम शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत.अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्री वादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शेतीपिकांना बसला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण या तालुक्यात सलग दोन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे शेतात उभी असलेली पिके नष्ट झाली होती. विशेष करून या वादळाचा व पावसाचा फटका द्राक्ष पिकाला सर्वाधिक बसला. द्राक्ष घडांमध्ये मनी भरण्याचे तर काही ठिकाणी फुलोरा लागलेला असताना पावसामुळे फुलोरा झडून गेला, द्राक्ष मण्यांनाही तडे पडले. नाशिक जिल्ह्यातील १७० गावातील सुमारे दीड हजार शेतक-यांना या ओखी वादळाचा फटका सहन करावा लागला. १२९५ हेक्टर क्षेत्रावर त्याचा परिणाम झाल्याने द्राक्ष बागायतदारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. पावसाने दोन दिवस झोडपून काढल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतक-यांनी पाऊस उघडल्यावर शेतीची सारवा सारव करून टाकली व त्यानंतर शासनाने ओखी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतिहेक्टरी १३,५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु दोन महिने उलटूनही सरकारकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. या संदर्भात गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक जिल्ह्यासाठी दोन कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडे वर्ग केला असून, येत्या दोन दिवसांत सदरचे पैसे शेतक-यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शिवाय या या पैशांमधून बॅँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक