शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानक ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तापमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशांपर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळूहळू कमी होत चालली आहे. मंगळवारी (दि.२५) किमान तापमानाचा पारा १४.३ अंशांपर्यंत वर सरकला. एकूणच कमाल तापमानाचा पारादेखील २५ अंशांवरून पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तापमान तीस अंशांपर्यंत आले असून, किमान तापमानदेखील १४ अंशांपर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी शहरात दुपारपासून ढगाळ हवामान दाटल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडीची तीव्रता घटल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.सर्दी-पडशाचे रुग्ण घटणारनागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. सध्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदलले आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले होते.सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीण भागदेखील गारठला होता.४निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यामध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्षबागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण