शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य खरेदीसाठी केला दोन कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:26 IST

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य केंद्रांमध्ये असलेली अपुरी व्यवस्था पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही व्यवस्था बळकट करण्यासाठी मदतीचा हातभार लागला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी करून त्याचे वाटप केले असून, काही लोकप्रतिनिधींनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांना निधी दिला आहे.

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य केंद्रांमध्ये असलेली अपुरी व्यवस्था पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही व्यवस्था बळकट करण्यासाठी मदतीचा हातभार लागला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी करून त्याचे वाटप केले असून, काही लोकप्रतिनिधींनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांना निधी दिला आहे.नाशिक जिल्हा परिषदेची आरोग्यव्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून चालत असताना ग्रामीण भागातील जनतेला प्राथमिक उपचार व महिलांचे बाळंतपण यासारख्या सुविधा पुरविली जाते. मात्र कोरोनासारख्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या साहित्याचा व उपकरणांचा आरोग्य केंद्रांना आजवर कधी गरज पडली नाही. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील जनतेचा त्यापासून बचाव करण्यासाठी ही साधनसामग्रीची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील सात लोकप्रतिनिधींनी आपल्या विकासनिधीतील रक्कम आरोग्य साधने खरेदीसाठी थेट जिल्हा परिषदेच्या स्वाधीन केली.जिल्हा परिषदेला सुमारे दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिला असून, त्यातून खरेदी केलेली साधने आपापल्या मतदारसंघातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे. त्यात विशेष करून हायड्रोक्लोराईड, थ्री लेअर मास्क, पीईपी किट््स यांसारख्या कोरोना प्रतिबंधात्मक साधनांबरोबरच, काही लोकप्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पलंग, चादर, बेडशिट््स अशा आवश्यक व कायमस्वरूपी लागणाºया वस्तू पुरविल्या आहेत.---------------------स्थानिक पातळीवर सूचनामुळातच राज्य सरकारने व आरोग्य विभागानेदेखील लोकप्रतिनिधींच्या निधीतून आरोग्यव्यवस्था बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीची खरेदी करण्यात यावी, अशा सूचना स्थानिक पातळीवर दिल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्य उपकरणांची खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले असताना, आपत्ती व्यवस्थापनांतर्गतदेखील जिल्हा परिषदेला वीस लाख रुपये कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यासाठी देण्यात आले आहेत.कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र निधी नसला तरी, लोकप्रतिनिधींनी मोठी मदत केली आहे. त्यांच्या मदतीतून त्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास हातभार लागला आहे. लवकरच साथरोग नियंत्रण व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना लागणाºया औषधांचीही खरेदी करण्यात येणार आहे.- डॉ. कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक