शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकांना आॅनलाइन कंपनीकडून दोन कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:04 IST

देशभरातील ग्राहकांना आॅनलाइन हॉटेल बुकिंग करून देणाऱ्या ‘ओयो’ या आॅनलाइन ट्रॅव्हल एजंट कंपनीने नाशिकच्या ४२ हॉटेलमालक आणि हॉटेलचालकांचे प्रत्येकी किमान पाच लाखांहून अधिक रकमेचे पर्यटक निवास शुल्क भरलेले नाही.

नाशिक : देशभरातील ग्राहकांना आॅनलाइन हॉटेल बुकिंग करून देणाऱ्या ‘ओयो’ या आॅनलाइन ट्रॅव्हल एजंट कंपनीने नाशिकच्या ४२ हॉटेलमालक आणि हॉटेलचालकांचे प्रत्येकी किमान पाच लाखांहून अधिक रकमेचे पर्यटक निवास शुल्क भरलेले नाही. २०१९ वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून सुमारे दोन कोटींहून अधिक रक्कम या कंपनीने न भरता फसवणूक केली असल्याचा आरोप नाशिकच्या रेसिडेन्शिअल अ‍ॅण्ड हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.संघटनेच्या वतीने अध्यक्ष रोहित उगावकर, अन्य पदाधिकाऱ्यांकडून फसवणुकीबाबत पोलीस उपायुक्तांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. संबंधित कंपनी ही पर्यटक आणि प्रवाशांना आॅनलाइन बुकिंग देऊन नाशिकच्या हॉटेलचालकांना एका महिन्यानंतर त्याचा परतावा देत होती. गत वर्षापर्यंत कंपनीने या करारानुसार हॉटेलचालकांना त्यांची रक्कम दिली. मात्र, या वर्षाच्या प्रारंभापासून हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा न करता परस्पर कमी शुल्क आकारणी केली जाणे, करारनाम्यात नमूद नसलेल्या बाबींचाही कंपनीच्या शुल्कात समावेश करणे तसेच करारानुसार महिन्यानंतर शुल्क परतावा न देता आठ महिने थकविणे यांसारखे प्रकार करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश गोठी, जश ठक्कर, कुणाल ओंकार, संजय मुदलीयार आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत ओयो कंपनीचे नाशिक विभागाचे प्रमुख प्रशांत हिंदुजा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.ओयोने रक्कम थकवलेल्या ४२ जणांमध्ये १८ व्यावसायिक हे हॉटेल भाड्याने घेऊन चालविणारे आहेत. अशा हॉटेलचालकांना एकीकडे हॉटेलमालकाला द्यावे लागणारे मासिक भाडे भरणेच अशक्य झाले आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांची कुचंबना अधिक असून, त्यांच्यापुढे हॉटेल चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीonlineऑनलाइनhotelहॉटेल