शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दोन कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:52 IST

मालेगाव : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाले असताना शासनाकडून आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक उद्योग, कारखाने यंत्रमाग सुरू करण्यात आले. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दोन कोटी २५ लाख रुपये महसुली उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देमालेगाव उपप्रादेशिक विभाग : अत्यावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी ई-पासची सुविधा

शफीक शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाले असताना शासनाकडून आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक उद्योग, कारखाने यंत्रमाग सुरू करण्यात आले. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दोन कोटी २५ लाख रुपये महसुली उत्पन्न मिळविले आहे.या काळात शहरातील सर्वच व्यवसाय, शासकीय कामकाज बंद असताना उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे अत्यावश्यक सेवा दिल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली. साधारणपणे लॉकडाऊनचे तीन महिने नागरिकांसाठी अत्यंत हलाखीचे गेले. या काळात शासनाच्या आदेशानुसार काही कर्मचारी कार्यालयात हजेरी लावून कामकाज पार पाडत होते.लॉकडाऊन काळात वाहने बंद होती. मात्र नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा आणि जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात होत्या. त्यासाठी काही वाहनांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता, तर आरोग्यविषयक शस्रक्रिया करण्यासाठी मुंबई, नाशिकसह तज्ज्ञ डॉक्टरांकडे नागरिकांना उपचार घेण्यासाठी जावे लागत होते. अशा वाहनांना शासनातर्फे ई-पास देण्यात आले होते. मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुमारे २ हजार १८५ वाहनांना अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्याकरिता ई-पास उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांना कोणतीही अडचण भासली नाही. गॅस, दूध, भाजीपाला, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू लॉकडाऊन काळात मिळू शकल्या.वायुवेग पथकाद्वारे शहरातील अवैध वाहतुकीविरोधात कारवाई सुरूहोती. लॉकडाऊन काळात आपल्या राज्यातून इतर राज्यात अनेकमजुरांचे स्थलांतर सुरू होते. तर काही मजूर राज्यातच आपापल्या घरी पायी जात होते. १६२ ट्रॅक्टर्स, ११२ ट्रेलर, ७ मालवाहू वाहने आणि इतर ६ वाहनांची नोंदणी करण्यात आली. वायुवेग पथकाद्वारे ३५० वाहनांची तपासणी करण्यात आली आणि दोषी आढळलेल्या ६२ वाहनचालकांविरोधात शासकीय कारवाई केली. एकूण ८८७ वाहनांची नोंद, अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्याकरिता ई-पासची सुविधा यात ५३१ दुचाकी, ६९ कार आणि जीपची नोंद आहे़ आरोग्यविषयक नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी वाहनांना शासनातर्फे ई-पास देण्यात आले होते. उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे १ हजार १३६ मजुरांना त्यांच्या गावी जाण्याकरिता ४९ एसटी बसेसची व्यवस्था केली. अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्याकरिता दोन हजार १८५ वाहनांना मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यात २ कोटी २५ लाख रुपये महसुली उत्पन्न मिळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalegaonमालेगांव