दिंडोरी : तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दोन गायी व एक वासरू ठार झाले.दिडोंरी तालुक्यातील उमराळे बु॥ येथे शनिवारी विजेचा कडकडाटासह पाऊस सुरू असताना एका शेतकऱ्याची गाय मोकळ्या जागेत चरत असताना गायीवर वीज पडल्याने ती जागीच ठार झाली. ६० ते ७० हजारांचे नुकसान झाल्याचे मालकाने सांगितले. घटनास्थळी पशुवैधकीय अधिकारी जगदाळे यांनी शवविच्छेदन केले व पंचनामा केला.उमराळे बु॥ जवळ असलेल्या चाचडगाव शिवारातील मोतीराम दगू थेटे यांची गाय धरणाच्या पाण्यालगत असलेल्या जागेत चरत असताना तिच्यावर अचानक वीज कोसळल्याने गायचा जागीच मृत्यू झाला. उमराळे बु॥ व चाचडगांव परिसरात पाऊस कमी विजेचा कडकडाट जास्त असल्यामुळे शेतकर्यामध्ये घबराराटीचे वातावरण पसरले आहे.मागे दोन ते तीन महिन्यापूर्वी जोरदार पावसाने विजेच्या कडकडाटासह आगमन झाले. त्यात वादळी वाऱ्याने ७ ते ८ व्यक्तींच्या घरावरील लोखंडी अॅँगल, पाईप, पत्रे उडून गेला. घरातील संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यावेळी मंडल अधिकारी तलाठी यांनी पडलेल्या घराचे पंचनामे केले होते; मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे समजते. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित दएावी अशी मागणी उमराळे बु।।चे सरपंच बापू टोंगारे, उपसरपंच देवीदास पगारे यांनी केली आहे. संजय थेटे उमराळे दुसऱ्या घटनेत मौजे कोशिंबे, ता. दिंडोरी येथील रघुनाथ रामा वाघ यांच्या मालकीची एक गाय व एक वासरु नैसिर्गक वीज पडून मयत झाले आहे. (वार्ताहर)
दिंडोरीत वीज पडून दोन गायी ठार
By admin | Updated: October 4, 2015 22:58 IST