नाशिक : शहर व परिसरात गणेशोत्सवाच्या अगोदरपासून सुरू असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना अद्यापही थांबता थांबत नसल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी महाजनादेश यात्रा असल्याने चोख बंदोबस्त तैनात होता; तरीदेखील सकाळी साडेसात वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच दौऱ्याच्या पुर्वसंध्येला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वासननगर भागात महिलेची सोनसाखळी लांबविली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फडणवीस नाशकात येणार असल्याने मंगळवारपासूनच शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली जात आहे. बुधवारी हजारो पोलीस फडणवीस यांच्या महजनादेश यात्रेनिमित्त रस्त्यावर होते. तसेच दिवसभर व रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी पोलीस करत आहे, तरीदेखील चोरटे सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस करून पोलिसांना आव्हान देत असल्याचे दोन घटनांवरून दिसून आले. लागोपाठ मंगळवारपासून दोन घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडल्या. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिपालीनगर येथे माधुरी अजित रूंद्रे (६७) या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. रूंद्र याा सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरूण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. सुमारे ७० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दुसºया घटनेत मंगळवारी वासननगर भागात रात्री आठ वाजेच्या सुमारास अनिता कैलास शेलार (४०) या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविली. या दोन्ही घटना व्हीआयपी नेत्यांच्या दौ-याच्या कालावधीत घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचा फौजफाटा शहरात असतानाही चोरटे धाडस करत असल्याने एकप्रकारे पोलिसांना हे आव्हानच आहे.-इन्फो-उपनगरला घरफोडीउपनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी मंगळवारी गोकुळपार्कमधील एका बंगल्याच चोरट्यांनी घरफोडी करून चोरट्यांनी १लाख ८ हजार रूपये किंमतीचे दागिणे लांबविले. याप्रकरणी प्रेमनिवास रामस्वरूप गुप्ता (५९) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक शिताफीने उघडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करत सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लागोपाठ दोन घटना : शहरात चोख बंदोबस्त तरीही ‘चेन स्नॅचिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 10:31 IST
सकाळी साडेसात वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच दौऱ्याच्या पुर्वसंध्येला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वासननगर भागात महिलेची सोनसाखळी लांबविली.
लागोपाठ दोन घटना : शहरात चोख बंदोबस्त तरीही ‘चेन स्नॅचिंग’
ठळक मुद्देउपनगरला घरफोडी, १लाख ८ हजार रूपये किंमतीचे दागिणे लांबविले.