सिडको : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी गेल्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आज चौथ्या दिवशी सिडको प्रभागातील दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनपा निवडणुकीसाठी सिडको प्रभागात प्रभाग क्रमांक २५, २६, २७, २८, २९ व ३१ अशा सहा प्रभागांचा समावेश आहे. गेल्या शुक्रवार (दि.२७) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी अमावास्या असल्याने एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता, तर दुसरा व तिसरा दिवसही निरंक गेला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यात पहिला अर्ज प्रभाग क्रमांक २६(ब) या सर्वसाधारण महिला गटातून नाशिक महानगर युवा आघाडीच्या वतीने निर्मला भास्कर पवार यांनी, तर दुसरा अर्ज प्रभाग क्रमांक २७(अ) या अनुसूचित जातीच्या गटातून किरण हरी ढवळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)
दोन उमेदवारांचे अर्ज दाखल
By admin | Updated: January 30, 2017 23:28 IST