शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भावांची चौघा संशयितांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:23 IST

दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे़

नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे़  कल्पेश पाटील (रा़ पाथर्डी फाटा)हे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या भावासमवेत दुचाकीवरून जात होते़ आनंदनगरमधील देवराज धनदायी रो-हाउसच्या समोरून जात असताना संशयित राजू गणेश कटाळे व त्याच्या इतर तीन साथीदारांनी दुचाकी अडविली़ यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या चेनमधील सहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा बळजबरीने ओढून पळवून नेला. इंदिरानगर पोलिसांनी संशयित राजू कटाळे यास अटक केली असून, उर्वरित तीन साथीदारांचा शोध सुरू आहे़घरफोडीत सोन्याच्या  दागिन्यांची चोरीघराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चौदा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सातपूरच्या डॉ. आंबेडकर चौकात गुरुवारी (दि़१९) पहाटे घडली़ श्यामराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पहाटेच्या सुमारास त्यांचे आई-वडील घरात झोपलेले असताना चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़रोहित्राच्या सुट्या भागांची चोरीजॉगिंग ट्रॅक बोगद्याजवळ असलेल्या २५ केव्ही रोहित्राचे मार्सन बनावटीचे तांबे व अ‍ॅल्युमिनियमचे २३ हजार रुपये किमतीचे सुटे भाग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी वरुण वाघ यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत.बुलेटची चोरीविनयनगरच्या वैष्णवी अपार्टमेंटमधील रहिवासी केतन शिरोळे यांची ७० हजार रुपये किंमतीची (एमएच ४१, एएच ३५४८) या क्रमांकाची बुलेट दुचाकी चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सावत्र बापाकडून लोखंडी रॉडने मारहाणभाड्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आईला मारहाण करीत असलेल्या वडीलांना विरोध केला असता त्यांनी पत्नीसह दोन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कैलास नगरमध्ये गुरुवारी (दि़१९) घडली़ या प्रकरणी लोटण पूरण यादव (४०) विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय