नाशिक : शहरातून दोन मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, या प्रकरणी अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्रिमूर्ती चौक परिसरात घराच्या वाहनतळात उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी दत्तात्रय नारायण बागुल (रा. त्रिमूर्ती चौक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बागुल यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच १५ सीवाय ७८१३) घराच्या वाहनतळात लॉक करत उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लांबविली.दुसरी घटना आयटीआय परिसरात घडली. अतुल बबन शिरसाठ यांनी त्याची दुचाकी (क्र. एमएच १५ ईके ३०४७) आयटीआय मैदानाबाहेर लॉक करून उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती हातोहात पळविली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगरांमधून दोन दुचाकी लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:49 IST
नाशिक : शहरातून दोन मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, या प्रकरणी अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपनगरांमधून दोन दुचाकी लांबविल्या
ठळक मुद्देयाप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.