लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर मार्गावर बसस्थानकासमोर बंगलोर येथून दिल्लीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एचआर- ५५, डब्ल्यू-७३४६ क्रमांकाच्या कंटेनरने दुचाकीला (एमएच-४१ एच ४५६४) जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. विक्र म चिंतामण पवार (२५, रा. पिंपळगाव, मालेगाव) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर त्याच्या सोबत असलेल्या युवकाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक धर्मेंद्र उमेशराय जाट यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी रेल्वेस्थानकाजवळ महिलेने रेल्वेखाली आत्महत्या केली. या महिलेची ओळख पटलेली नाही. पोलीस वारसाचा शोध घेत आहेत.येथील रेल्वेच्या बंधाऱ्यात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मनमाड शहरात आज झालेल्या वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाची ओळख पटली असून उर्वरित तिघांची ओळख पटविण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहे.
पुणे-इंदूर मार्गावर दोन दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: July 5, 2017 00:17 IST