शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

रिक्षातून मोबाइल चोरी करणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

नाशिक : शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. २२) कारवाईत मोबाइल चोरी करणाऱ्या रिक्षाचालक व त्याचा साथीदार अशा ...

नाशिक : शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. २२) कारवाईत मोबाइल चोरी करणाऱ्या रिक्षाचालक व त्याचा साथीदार अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गंगाधर शंकर केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सातपूर गाव मार्केट ते आयटीआय सिग्नल दरम्यान काही दिवसांपूर्वी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरीचे प्रकार घडले असून त्याबाबत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हेही दाखल आहेत. या मोबाइल चोरट्यांच्या मागावर असलेल्या मध्यवर्ती गुन्हे शाखेला संबंधित संशयित रिक्षाचालक व त्याचा साथीदार चोरीचा मोबाइल विक्री करण्यासाठी ठक्कर बाजार, सीबीएस येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत सापळा रचून संशयित भोलानाथ सीताराम साळवे (२०, रा. गंजमाळ, भद्रकाली) व अभिषेक रमेश हिरे (२०, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मोबाइलसह दोन्ही संशयितांकडे चोरीचे एकूण ८ मोबाइल फोन मिळून आले. दोघांनीही मोबाइल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना सातपूर पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेने दिली आहे.