शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव खांबमध्ये अडीच वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 13:39 IST

शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देबिबट्या अत्यंत सुदृढ वनविभागाच्या रोपवाटिकेत दमदार पाहुणचार

नाशिक : येथील शहराजवळच्या खेड्यांपैकी एक असलेल्या पिंपळगाव खांब या गावातील एका मळ्यामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बुधवारी (दि.१३) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अडीच वर्षाचा बिबट्या अडकला. बिबट्याच्या डरकाळ्यांच्या आवाजाने शेतकरी जागे झाले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाला कळविली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक रेस्क्यू व्हॅनसह पिंपळगाव खांब येथे दाखल झाले. रात्री दोन वाजेच्या सुमारास पिंजरा वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनमधून तत्काळ वनविभागाच्या गोवर्धन शिवारातील रोपवाटिकेत हलविण्यात आला.याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली होती. शनिवारी तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी वनरक्षकांसमवेत पाहणी करून येथील मळे भागात पिंजरा तैनात केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या पिंज-यात बिबट्या अडकला. याबाबतची माहिती मिळताच गोसावी यांनी रात्री वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनचालक प्रवीण राठोड, अशोक खानझोडे यांना तत्काळ पाचारण केले. गावकºयांच्या मदतीने त्यांनी पिंजरा वाहनात टाकून तत्काळ हलविला. उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या आदेशान्वये बुधवारी रात्री उशिरा बिबट्याला शहरापासून लांब अंतरावर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बिबट्या अत्यंत सुदृढ असून त्याने सकाळी वनविभागाच्या रोपवाटिकेत दमदार पाहुणचारदेखील घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव