शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादकांना अडीच कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:21 IST

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी, व चांदवड या चार तालुक्यातील ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २ कोटी ४२ लाख ४६ हजार ३०१ रु पयांच्या फसवणूक प्रकरणी तीन व्यापा-यांवर पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी, व चांदवड या चार तालुक्यातील ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २ कोटी ४२ लाख ४६ हजार ३०१ रु पयांच्या फसवणूक प्रकरणी तीन व्यापा-यांवर पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्सपोर्टच्या मालकांनी व त्यांच्या भागिदारांनी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांची द्राक्ष खरेदी केली. पण त्यांना अद्यापही द्राक्ष मालाचे पैसे न देता पलायन करत कोट्यवधी रु पयांची फसवणूक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगावचे शेतकरी रमेश खैरे व अन्य शेतकºयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी, व चांदवड तालुक्यातील जवळपास ७० द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी ओझर येथील आदित्य अँग्रो एक्स्पोर्टचे व्यापारी संतोष बबन गवळी रा शिवाजी नगर ओझर, निलेश बाळासाहेब दवांगे, रा खेडगाव, पंकज माधव मोहन रा ओझर यांनी शेतकºयांचा द्राक्षमाल एक्स्पोर्टला पाठवून चार तालुक्यातील ७० शेतकºयांना खोटे धनादेश देत जवळपास २ कोटी, ४२ लाख, ४६ हजार ३०१ रु पयांची फसवणूक करत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गेल्या कित्येक दिवसांपासून फरार झाले होते. डिसेंबर महिन्यात व्यापारी निलेश बाळासाहेब दवांगे, रा खेडगाव, व पंकज माधव मोहन रा ओझर आदींची माहिती शेतकºयांना मिळाली. त्यावर व्यापारी निलेश दवांगे यांनी शेतकºयांचे पूर्ण पैसे २४ तारखेपर्यंत देणार असल्याचे हमीपत्र पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनमध्ये शेतकºयांसमोर दिले मात्र हमीपत्र देऊनही व्यापारी निलेश दवांगे पुन्हा फरार झाल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनमध्ये तिघा व्यापाºयांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीाक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश चौधरी करत आहे.यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी रमेश खैरे पिंपळगाव बसवंत,अनिल कोठुळे, विनोद पाटील जउळके वणी, नंदू मते, साकोरे मिग, आनंद गायकवाड, जिव्हाळे, अनिल जाधव सोंनजांब, रोहित जाधव पालखेड, बाळासाहेब गायकवाड पालखेड, राजाभाऊ परदेशी, रमेश कुयटे, सत्यजित भालेराव, भगवंत धुमाळ, बाळासाहेब राजगुरू, आदिंसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक