शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

By अझहर शेख | Updated: October 11, 2024 11:31 IST

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे.

Nashik Deolali Camp : नाशिकमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षणा दरम्यान झालेल्या स्फोटादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. तोफेचा बॉम्बगोळा फुटल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प आर्टिलरी फिल्ड फायरिंग रेंज याठिकाणी अग्नीविरांची टीम तोफ चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना इंडियन फिल्ड गनद्वारे (तोफ)बॉम्बगोळा डागत असताना झालेल्या स्फोटात दोन अग्निवीर गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तर एक अग्निवीर जखमी असून लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. गोहिल विश्वराज सिंग (वय२०), सैफत शीत (वय२१दोघे रा. आर्टिलरी सेंटर,  नाशिकरोड) अशी मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीरांची नावे आहेत. 

नाशिक शहरात देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरी चे शिंगवेबहुला फायरिंग रेंज आहे. अग्निवीर नाशिकरोड तोफखाना केंद्रात भरती होऊन तेथे त्यांचे लष्करी प्रशिक्षण सुरू आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अग्निविरांची एक तुकडी शिंगवे बहुलाला फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा सराव करण्यासाठी गेलेली होती. यावेळी इंडियन फिल्ड गन क्र-४ मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. यामुळे बॉम्बचे शेल उडून या अग्निवीरांच्या शरीरात शिरले. तिघा जखमींना तात्काळ लष्करी अधिकारी व जवानांनी देवळाली कॅम्प हॉस्पिटलमध्ये लष्करी वाहनातून हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी गोहिल व सैफत यांना तपासून मृत घोषित केले. याबाबतची खबर देवळाली कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असलेले हवालदार अजित कुमार यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कळविली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पी.एस देवरे करीत आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी आर्टिलरी च्या जवानांनी दोघांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते. शवविच्छेदन केल्यानंतर जवानांनी अग्निवीरांचे मृतदेह नाशिकरोड आर्टिलरी सेंटर येथे हलविले. याबाबत आर्टिलरी सेंटरकडून अधिक कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस