नाशिक : शिर्डी ते नाशिक असा खासगी बसने प्रवास करणाऱ्या मुंबई येथील एका इसमाचे सुमारे सव्वातीन लाख रुपये चोरी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेशकुमार लालसिंग राजपुरोहित (३६, गुलालवाडी, पहिला मजला, भुलेश्वर, काळबादेवी रोड, मुंबई) हे सोमवारी रात्री शिर्डीहून मुंबईसाठी स्पीडकिंग या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये (एमएच ४३, एच २२३०) बसले़ ही बस रात्री सव्वा वाजेच्या सुमारास द्वारका येथे पोहोचली़ यादरम्यान त्यांना झोप लागलेली होती़ बस द्वारका येथे पोहोचली असता राजपुरोहित यांच्याकडील कापडाच्या बॅगमधील तीन लाख ३० हजार रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ या बॅगमध्ये रोख रकमेबरोबरच आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, हिशेबाची डायरी आदि साहित्य होते़राजपुरोहित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
खासगी बसप्रवासात सव्वातीन लाखांची चोरी
By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST