मुख्यालयातील रत्नाकर पगार अक्कलकुव्यालानाशिक : विभागातील जिल्हा तांत्रिक सेवा व जिल्हा सेवा वर्ग-३ मधील कर्मचार्यांच्या महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मध्ये तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्त्या देण्यात आल्या असून, त्यात विभागातील २५ विस्तार अधिकार्यांना सहायक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे.नाशिक विभागातील बढती मिळालेल्या विस्तार अधिकार्यांची नावे पुढीलप्रमाणे- सध्याचे पद कंसात बदलीनंतर सहायक गटविकास अधिकारी मिळालेले ठिकाण- मालेगाव विस्तार अधिकारी अजितसिंह पवार- (सुरगाणा), दिंडोरी विस्तार अधिकारी दत्तात्रय चित्ते (कळवण) मालेगाव विस्तार अधिकारी दादाजी जाधव (पारनेर, अहमदनगर), सिन्नर विस्तार अधिकारी किसन खताळे (मालेगाव), महेश पोतदार (नंदुरबार), धुळे विस्तार अधिकारी गौतम सोनवणे (शिंदखेडा), अहमदनगर विस्तार अधिकारी विजय अहिरे (अकोले, अहमदनगर), विस्तार अधिकारी रत्नाकर पगार (अक्कलकुवा, नंदुरबार), धुळे विस्तार अधिकारी राजेंद्र देसले (तळोदा, नंदुरबार), अहमदनगर विस्तार अधिकारी संजय दिघे (कर्जत, अहमदनगर), पेठ कृषी विस्तार अधिकारी दिलीप सोेनकुसरे (येवला, नाशिक), कृषी अधिकारी अन्सार शेख (श्रीगोंदा, अहमदनगर), सुरगाणा कृषी अधिकारी शरदकुमार कासार (शिरपूर, धुळे), कळवण कृषी अधिकारी भरत वेंदे (भुसावळ, जळगाव), कृषी अधिकारी विठ्ठल फुलकर (मुक्ताईनगर, जळगाव), कक्ष अधिकारी बी. डी. गोेसाावी (अमळनेर, जळगाव), कक्ष अधिकारी सी.एस. अहिरे (पारोळा, जळगाव), दिंडोरी सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी शशिकला राजगुरू (चांदवड, नाशिक), सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी अक्का मोरे (धुळे), निफाड विस्तार अधिकारी स्मिता गुजराथी (नाशिक), विस्तार अधिकारी भगवान खांेडे (नवापूर, नंदुरबार), कक्ष अधिकारी एस.एस. नरवाडे (चाळीसगाव, जळगाव), सहायक पशुधन विकास अधिकारी सुखदेव काळोखे (शेवगाव, अहमदनगर), सहायक पशुधन विकास अधिकारी आर.बी. सोनवणे (पाथर्डी, अहमदनगर), विस्तार अधिकारी विलास सनेर (धरणगाव, जळगाव) अशी सहायक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकार्यांची नावे आहेत. नाशिक जिल्हा परिषदेतील मुख्यालयात ग्रामपंचायत विभागात तसेच पेठ व मंत्रालयात तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती असलेले रत्नाकर पगार यांची थेट अक्कलकुव्याला पदोन्नती झाली आहे.(प्रतिनिधी)अटी-शर्तींवर पदोन्नतीकाही विस्तार अधिकार्यांना न्यायालयीन निर्णयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून तर काही कर्मचार्यांना फौजदारी प्रकरण व विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आली आहे. यात दत्तात्रय चित्ते व दिलीप सोनकुसळे यांना न्यायालयीन निर्णयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून तर महेश पोतदार व सी.एस. अहिरे यांना फौजदारी प्रकरण व विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आली आहे.
पंचवीस विस्तार अधिकारी झाले गटविकास अधिकारी
By admin | Updated: May 14, 2014 00:00 IST