शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे कोटींसाठी संघटना सरसावल्या

By admin | Updated: June 8, 2017 01:08 IST

दोनशे कोटींसाठी संघटना सरसावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने दिलेले सुमारे दोनशे कोटींचे धनादेश वटले नसल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून, यावर तोडगा काढण्यासाठी तत्काळ जिल्हा बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिग्रहण सोनकांबळे यांनी दिली. सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व मजूर संस्था संचालकांनी गुरुवारी (दि. ८) दुपारी दोन वाजता याच प्रश्नावर जिल्हा परिषदेत तातडीची बैठक बोलविली आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेने दिलेल्या दोनशे कोटींच्या धनादेशांबाबत बुधवारी (दि.७) लोकमतने ‘दोनशे कोटींचे भवितव्य अंधारात’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्णाचे लक्ष वेधले होते. त्यावर आता प्रशासन आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, मजूर संस्था संचालक यांनी तातडीची बैठक बोलवून पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी (दि. ८) दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्य रावसाहेब थोरात सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी जिल्ह्णातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्था संचालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. टी. शिंदे, कार्याध्यक्ष विनायक माळेकर, जिल्हा मजूर संघ संचालक शशिकांत आव्हाड, दिनकर उगले यांनी केले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर मिळून देण्यात आलेले सुमारे दोनशे कोटींचे धनादेश अद्याप वटलेले नाही. नव्यानेच बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व तत्कालीन कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांना बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जून अखेरपर्यंतची मुदत दिली आहे; मात्र तीन महिन्यांपासून तग धरून राहिलेल्या बेरोजगार अभियंते व मजूर संस्था संचालकांचा धीर व संयम सुटू लागल्यानेच गुरुवारच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीनंतर बेमुदत उपोषणाची तयारी सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था संचालकांनी केल्याचे समजते.जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुपाटबंधारेसह विविध विभागांनी त्यांच्या विकासकामांपोटी मागील आर्थिक वर्षात सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच मजूर संस्था संचालकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश दिले होते; मात्र मार्चपासून जूनपर्यंत हे धनादेश वटतच नसल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था संचालक काहीसे अस्वस्थ झाले आहेत.