शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

एक खिडकीचे वाजले बारा

By admin | Updated: December 23, 2015 23:40 IST

मनपा सिडको विभाग : सोयहोण्याऐवजी गैरसोयच अधिक

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एक खिडकी टोकन योजनेचा कारभार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडूनच हाकला जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कामकाज करण्यासाठी जबाबदार कर्मचारी म्हणून किमान लिपिक असलेल्या कर्मचाऱ्यास ही जबाबदारी देण्याची गरज आहे. नागरिकांना महापालिकेशी निगडित असलेल्या कामकाजामधील अडचणी सोडविण्यासाठी व त्या दिलेल्या कालावधीतच पूर्ण करून संबंधितांना खुलासा व्हावा यासाठी मनपाच्या वतीने तत्कालीन आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी सर्वच विभागात एक खिडकी टोकन योजना अंमलात आणली आहे. यामुळे नागरिकांना एकाच छताखाली त्यांची सर्व कामे करण्याची सोेय करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म, मृत्यू दाखल्यांचे अर्ज देणे यांसह नागरिकांना मनपाशी निगडित असलेल्या सर्वच कामकाजासाठी एक खिडकी टोकन योजना अंमलात आणली आहे. यावर विभागीय अधिकाऱ्यांची लक्ष देण्याची जबाबदारी आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या लिपिक पदाच्या कर्मचाऱ्यांवर कामकाज सोपविणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु सिडको विभागात याच एक खिडकी टोकन योजनेचा कारभार हा चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी बघत आहे. यातील एक महिला कर्मचारी या बांधकाम विभागात बिगारी व इतर दोन महिला कर्मचारी ह्या शिपाई म्हणून कार्यरत आहे. एक खिडकी टोकन विभागात नागरिकांना जन्म-मृत्यूचे अर्ज दिले जात असून घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कामकाजासाठी नागरिकांनी दिलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी ही येथील कर्मचाऱ्यांची आहे. विशेष म्हणजे दिलेले अर्ज हे संबंधित विभागाकडे पाठवून दिलेल्या मुदतीच्या आत ते नागरिकांना देणे बंधनकारक आहे. यामुळे विभागीय कार्यालयात हे काम चतुर्थश्रेणी कर्मचारी करीत असल्याने नागरिकांची गैरसोयच होत आहे. (वार्ताहर)