शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यातील १२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:06 IST

देवळा : देवळा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या १२ रु ग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या २८ कोरोना बाधित रु ग्णांपैकी एका वृध्द महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून २० रु ग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. या दिलासादायक प्रकाराने देवळा तालुक्याची कोरोना मुक्ततेकडे वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे.

उपचार घेत असलेल्या उर्वरित ७ रु ग्णांपैकी दोन रु ग्णांवर देवळा जिल्हा परिषद विद्या निकेतन येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. एक रु ग्ण खासगी रु ग्णालयात उपचार घेत आहे. चार रु ग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. शुक्र वारी देवळा तालुक्यातील २० संशयित व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे.देवळा शहरात कोरोनाचे रूग्ण सापडल्यामुळे दि. १३ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून शहरात ४ जुलैनंतर एकही रु ग्ण आढळला नाही.जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश आल्याचे दिसत आहे. सोमवार दि. १३ जुलैपासून शहरातील सर्व दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास नगरपंचायतीने परवानगी दिलेली आहे. दुकानदारांनी व ग्राहकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता आदी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या