शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोनाचा बारावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:48 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असून, टाकळी येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात बुधवारी (दि.३) दिवसभरात ६ बाधित रुग्ण आढळले असुन त्यामुळे बधितांची संख्या २५६ झाली आहे.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असून, टाकळी येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात बुधवारी (दि.३) दिवसभरात ६ बाधित रुग्ण आढळले असुन त्यामुळे बधितांची संख्या २५६ झाली आहे.कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच आता मृत्युचे प्रमाण देखील वाढू लागल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगर टाकळी येथील एका इसमाचा कोरोनामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. सदरचा व्यक्ती हा टाकळी येथील प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळच वास्तव्याला होता. त्याला नक्की संसर्ग कसा झाला हे आता अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी प्रशासन त्याचा शोध घेत आहे. मात्र, या इसमास मधुमेहाचा त्रास होता, त्यातच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला ३१ मे रोजी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि. २) सकाळी त्याचे निधन झाले, तर सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पंचवटीतील कलानगर परिसरात ४६ वर्षीय इसमाचादेखील पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सिडकोतील उत्तमनगर येथे एका पिता -पुत्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आडगाव येथील कोणार्कनगर येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.नाशिक शहराच्या विविध भागात रुग्ण आढळत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेची धावपळ वाढली आहे. शहरात सध्या ६६ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक