शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

एनडीसीसी प्रशासक समितीतून तुषार पगार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:10 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे..

ठळक मुद्देवैयक्तिक कारण : नियुक्ती आदेशाची शाई वाळण्यापूर्वीच धक्का

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे..ज्येष्ठ सनदी लेखापाल तुषार पगार यांनी मंगळवारी (दि.२३) सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात सदस्यपदी नियुक्ती करून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र, पूर्वनियोजित व्यावसायिक आणि कौटुंबिक प्राधान्यक्रमामुळे  आपण बँकेच्या कामास सध्या वेळ व न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रशासक समितीतून आपले नाव वगळावे, अशी विनंती पगार यांनी केली आहे. एखाद्या विशिष्ट विषयात बँक प्रशासनाला माझ्याकडून काही कामाची गरज भासली तर त्यासाठी आपण उपलब्ध राहू, असे त्यात पगार यांनी नमूद केले आहे. गैरव्यवहार आणि आर्थिक व्यवहारातील अनियमितता यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ २०१७ मध्ये  रिझर्व्ह बँकेने प्रशासक मंडळ बरखास्त केले आणि प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात जाऊन रिझर्व्ह बँकेच्या कारभारास स्थगिती आणली हेाती. आता गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी झाली आणि त्यात रिझर्व्ह बँकेचे आदेश कायम केल्याने अखेरीस हे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळे प्रशासक समितीचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी (दि.२२) सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तीन सदस्यीय प्रशासकीय सदस्यीय समिती गठित केली. सहकारी सोसायटींचे सहसचिव एम. ए. अरीफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपनिबंधक चंद्रशेखर बारी आणि सनदी लेखापाल तुषार पगार यांची सदस्यपदी नियुक्ती केली होती. पगार यांनी जुन्या पीपल्स को ऑप. बँकेचे प्रशासक म्हणून काम केले आहे. मंगळवारी (दि.२३) या पैकी अरीफ आणि बारी  यांनी दुपारी कार्यभार स्वीकारला. मात्र, तुषार पगार यांनी सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात आपले नाव वगळण्याची विनंती केली असल्याने त्यांनी मात्र पदभार स्वीकारला नाही. सहकार खात्याला आता नवीन सदस्याचा शोध घ्यावा लागणार आहे.बँकेची आर्थिक स्थिती बनली बिकटनाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती जर्जर असून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. अन्य अनेक अडचणीदेखील आहेत. राजकीय नेते, त्यांचे नातेगोते असे अनेक आर्थिक संबंध बँकेच्या  व्यवहारात गुंतलेले आहेत. अशा वेळी या बँकेत काम करून या बँकेला ऊर्जितावस्था आणणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे बँकेवर काम करण्यास तज्ज्ञांना फारसे स्वारस्य नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक