शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एनडीसीसी बँकेचे प्रशासक समिती सदस्य तुषार पगार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच ...

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासक समितीच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत.

ज्येष्ठ सनदी लेखापाल तुषार पगार यांनी मंगळवारी (दि.२३) सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात सदस्यपदी नियुक्ती करून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र, पूर्वनियोजित व्यावसायिक आणि कौटुंबिक प्राधान्यक्रमामुळे आपण बँकेच्या कामास सध्या वेळ व न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रशासक समितीतून आपले नाव वगळावे, अशी विनंती पगार यांनी केली आहे. एखाद्या विशिष्ट विषयात बँक प्रशासनाला माझ्याकडून काही कामाची गरज भासली तर त्यासाठी आपण उपलब्ध राहू, असे त्यात पगार यांनी नमूद केले आहे.

गैरव्यवहार आणि आर्थिक व्यवहारातील अनियमितता यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने प्रशासक मंडळ बरखास्त केले आणि प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात जाऊन रिझर्व्ह बँकेच्या कारभारास स्थगिती आणली हेाती. आता गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी झाली आणि त्यात रिझर्व्ह बँकेचे आदेश कायम केल्याने अखेरीस हे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळे प्रशासक समितीचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी (दि.२२) सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तीन सदस्यीय प्रशासकीय सदस्यीय समिती गठित केली. सहकारी सोसायटींचे सहसचिव एम. ए. अरीफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपनिबंधक चंद्रशेखर बारी आणि सनदी लेखापाल तुषार पगार यांची सदस्यपदी नियुक्ती केली होती. पगार यांनी जुन्या पीपल्स को ऑप. बँकेचे प्रशासक म्हणून काम केले आहे. मंगळवारी (दि.२३) या पैकी अरीफ आणि बारी यांनी दुपारी कार्यभार स्वीकारला. मात्र, तुषार पगार यांनी सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात आपले नाव वगळण्याची विनंती केली असल्याने त्यांनी मात्र पदभार स्वीकारला नाही. सहकार खात्याला आता नवीन सदस्याचा शोध घ्यावा लागणार आहे.

इन्फो...

बँकेची अवस्था जर्जर

नाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती जर्जर असून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. अन्य अनेक अडचणीदेखील आहेत. राजकीय नेते, त्यांचे नातेगोते असे अनेक आर्थिक संबंध बँकेच्या व्यवहारात गुंतलेले आहेत. अशा वेळी या बँकेत काम करून या बँकेला ऊर्जितावस्था आणणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे बँकेवर काम करण्यास तज्ज्ञांना फारसे स्वारस्य नसल्याची चर्चा आहे.