शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घोरवड घाटातील वळण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:43 IST

विंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

ठळक मुद्देसिन्नर-घोटी मार्ग : संरक्षक कठड्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.संरक्षक कठडे व दिशादर्शक फलक नसल्यामुळे घोरवड घाटातील वळण धोकादायक बनले आहे. वाहनधारकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिन्नरकडून घोटीकडे येण्यासाठी उतार असल्याने वाहनांना वेग अधिक असतो, तर घोटीकडून सिन्नरकडे जाणारी वाहने चढ असल्याने हळू असतात. सिन्नरकडून येणारी वाहने वळणावर संरक्षक कठडे नसल्याने सरळ दरीत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या वळणावर अपघात होऊन चार-पाच जणांना जीव गमवावा लागला होता. वळणाचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने घाटाच्या खाली गेली आहेत. मुंबईकडील साईभक्तसुद्धा याच मार्गाचा अवलंब करतात.त्यांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन घाटातील अपघाती वळणावर संरक्षक कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे.वाहनांची मोठी वर्दळसिन्नर-घोटी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. घोटी व सिन्नरला मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील शेतकरी आपला माल बाजारपेठेत विक्रीला नेण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मुंबई येथून येणारे साईभक्त याच मार्गाने शिर्डीला जातात. हा मार्ग सर्वांच्या सोयीचा आहे. मात्र, घोरवड घाटातील वळण सर्वांना धोकादायक ठरत आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी